उल्हासनगर :
विठ्ठलवाडी येथे वालधुनी उपनदी पाञात सरकारी आरक्षित भुखंडावर बीओटी तत्वावर माधव कंन्स्ट्रक्शन द्वारे सुरु असलेल्या प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीमुळे भविष्यात वालधुनी नदीपाञा लगतच्या रहिवाशी भागात वांरवार पुराचे पाणी गोरगरिबांच्या घरात घुसुन मालमत्तेचे नुकसान होणार हा संभाव्य धोका लक्षात घेवुन गेल्या अनेक दिवसांपासुन सुरु असलेल्या पाठपुराव्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या शिष्ठमंडळाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्त मा.डाॅ. इंदुराणी जाखड मॅडम यांची भेट घेवुन विठ्ठलवाडी स्मशानभुमी जवळील ब्रीज व रेल्वे रुळाखालील ब्रीजची रुंदी व उंची वाढविण्याची मागणी केली. तसेच नदीतील गाळ पावसाळ्यापुर्वी पुर्णता काढण्याबाबत सुचवले जेणेकरुन वालधुनी नदीपाञालगतच्या रहिवाशी भागास पुराचा कृञिम धोका उद्भवणार नाही. सोबतचं भारतीय जनता पक्षाच्या शिष्ठ मंडळाने कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी आयुक्तांनी सदर ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती केली त्यानुसार आयुक्त मॅडम १५ मार्च दुपारी २ वाजता स्वतः भाजप शिष्ट मंडळासोबत पाहणी करण्यास उपस्थित झाल्या.
सदर प्रसंगी स्थानिक पुरग्रस्त नागरिक व महिला वर्गाने आयुक्त मैडम यांना आपल्या समस्या सांगीतल्या.
Post a Comment