कल्याण :
सर्वत्र दहीहंडीची लगबग सुरू असतानाच गोविंदा पथकांना लागणाऱ्या टी-शर्ट अन्न वाहन इत्यादी सुविधा पुरवत असताना दहीहंडी खेळत असताना अथवा सराव करीत असताना होणारी दुखापत किंवा अपघात यासाठी येणारा वैद्यकीय खर्च हा परवडणारा नसतो याच पार्श्वभूमीवर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून दहीहंडी समन्वय समिती (महा) यांच्या मागणीनुसार शासना तर्फे गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्यात आले आहे.
मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवली जात असताना कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या सौजन्याने तिचाही हाऊस येथील आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात समोर रविवारी गोविंदा सुरक्षा विमा प्रमाणपत्र वाटप व दहीहंडी उत्सवाबाबत दहीहंडी समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या पदाधिकाऱ्यां च्या माध्यमातून मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.उल्हासनगर, अंबरनाथ या शहरातील तब्बल चाळीस गोविंदा मंडळाना मोफत विमा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याला समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर, गीता झगडे, विनोद झगडे, निरंजन आहेर, मिथुन सरदळ, राजेश सोनावडेकर, जय जवान गोविंदाचे सचिव विजय निकम तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, नगरसेवक अभिमन्यु गायकवाड, मंडळ अध्यक्ष संजय मोरे आणि सर्व गोविंदा मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment