कल्याण :
प्रभाग क्र.८८ -संतोष नगर-तिसगाव परिसरात सद्गुरू कृपा संकुल येथे आज खासदार डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून प्रभागातील जेष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून जेष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य जपण्यासाठी, तरुण युवकांसाठी ,महिला भगिणीसाठी ओपन जिम तयार करण्यात आली.
त्यांचा आज लोकार्पण सोहळा महिला जिल्हा संघटक- सौ. छायाताई वाघमारे तसेच महिला शहर संघटक-सौ. पुष्पाताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यासमयी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना, माझ्या प्रभागातील स्वछता तसेच प्रभागातील नागरिकांसाठी झालेली कामे पाहून त्यांनी कौतुक केले. माझ्या मागे प्रभागातील महिला नेहमी मोठ्या संख्येने खंबीरपणे साथ देण्यासाठी उभ्या असतात. आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा महिला वर्ग खुप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या म्हणून महिलांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले.
मी आज नागरिकांना दिलेल्या शब्दातून मुक्त झालो त्यामुळे मानसिक आनंद मिळाला. कार्यक्रमात सर्व नागरिकांनी भरभरून आशीर्वाद दिले. महिलांनी त्यांच्या मुलांना एक खेळण्याचे ठिकाण मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. तर युवकांनी शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करण्याचे साधन मिळाल्याने माझे धन्यवाद व्यक्त केले. पुढे अश्याच प्रकारे प्रभागात आणि कल्याण पूर्व शहरात नागरिकांसाठी नवनविन संकल्पना राबविण्याचे उद्दिष्ट मनात बाळगून आहे.
आजच्या या लोकार्पण समयी माझ्यासोबत श्री.दळवी सर, श्री. दिलीप दाखिनकर,श्री.शिवदास गायकवाड, श्री.शंकर पाटील, श्री. प्रशांत बोटे, श्री.अजित चौघुले, श्री.अरुनदेकर, श्री.प्रशांत अमीन, श्री.कृष्णा पाटील, श्री.निलेश रसाळ, सुजाता ताई शिंदे, वैशाली ताई ठाकूर, सौ.नीता केणी, तसेच महिला कार्यकर्त्या, शिवसैनिक, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment