उल्हासनगर - उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बँक सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील चोरीच्या घटना लक्षात घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आज दुपारी एक वाजता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बँक सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात बँकेत सीसीटीव्ही असणे, पूर्णवेळ सुरक्षा रक्षक असणे, वेळोवेळी योग्य सिक्युरिटी ऑडिट करणे, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण कसे ठेवता येईल यासारख्या बँकेच्या सुरक्षेबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या शिबिरात बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, केनरा बैंक,टीजेएस बँकेचे अधिकारी सहभागी झाले होते.
Post a Comment