माजी राज्यमंत्री श्री. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण लोकसभेची निवडणूक आढावा बैठक संपन्न.

 









उल्हासनगर:

माजी राज्यमंत्री कल्याण लोकसभा निरीक्षक श्री. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली व  इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कल्याण येथे काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत कल्याण लोकसभेतील काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस विधानसभा निहाय व जिल्हा निहाय बैठका घेण्यात आल्या. सर्वांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

विश्वजीत कदम यांनी सांगितले की, आघाडीचा जो निर्णय वरच्या स्तरावर होईल तो आपण सर्व मान्य करूच पण काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. INDIA या विरोधकांच्या आघाडीचा उमेदवार जरी असला तरी त्याला जिंकवण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे, असे निर्देश विश्वजित कदम यांनी दिले.

उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची स्वतंत्र बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष श्री. रोहित साळवे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

यावेळी काँग्रेस अथवा INDIA च्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान उल्हासनगर मधून होण्यासाठी उल्हासनगर काँग्रेस सज्ज राहील असे आश्वासन रोहित साळवे यांनी दिले. तसेच लोकसभा कोणीही लढली तरी ६ विधानसभेपैकी ३ विधानसभा काँग्रेस ला मिळाल्या हव्या अशी विनंती केली.

सादर बैठकीस उल्हासनगर शहर जिल्हा माजी अध्यख राधाचरण करोतिया , प्रदेश प्रतिनिधी वज्जरुद्दिन खान , ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, आजाद शेख , मुन्ना श्रीवास्तव , श्याम मढवि ,शंकर अहुजा , मनीषा महाकाळे , प्रा सिंधुताई रामटेके , विशाल सोनावणे , संतोष मिंडे ,निलेश जाधव , विलास डुबे ,राकेश मिश्रा ,रोहित गोखले , प्रमोद शिंदे , आबा साठे आदी पदाधिकारी उपस्तिथ होते.







Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget