उल्हासनगर:
सिंधूभवनच्या धर्तीवर उल्हासनगर शहरात एक सुसज्ज मराठी भवन उभारण्यात यावं,जेणे करून मराठी भाषा,मराठी संस्कृती,मराठी परंपरा जपता येतील व त्यासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेच्या बंडू देशमुख व संजय घुगे यांनी आज उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त अझीज शेख यांच्या कडे केली.आयुक्तांनी सुद्धा या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.उल्हासनगर शहरात मराठी समाज पण मोठया प्रमाणात वास्तव्यास आहे.असे असतांना काही लोक प्रतिनिधी मराठी समाजाला गृहीत धरण्याच काम अनेक वर्ष करीत आहेत असा आरोप बंडू देशमुख यांनी केला.मराठी भवन साठी निधी उपलब्ध करून दयावा यासाठी लवकरच आमदार व खासदार यांना ही निवेदन देऊन लवकरात लवकर एक सुसज्ज मराठी भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बंडू देशमुख व संजय घुगे यांनी सांगितले.
Post a Comment