"उल्हासनगर शहरात विक्रीसाठी रस्त्यांवर उभ्या केलेल्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चार चाकी वाहनांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा,तसेच अवजड आणि ओव्हरलोड पद्धतीने शहरात सुरू असलेली बेकायदेशीर,अति-धोकादायक वाहतूक थांबवा आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करा" अश्या आशयाचे निवेदन आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने उल्हासनगर शहर वाहतूक शाखा आणि कल्याण येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात देण्यात आलेले होते तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा ही देण्यात आलेला असल्याने उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय गायकवाड यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या विषयावर चर्चेसाठी बोलविल्यानंतर वाहतुकीला अडथळा करणाऱ्या आणि विक्रीसाठी रस्त्यांवर उभ्या केलेल्या चार चाकी वाहनांवर तसेच अवजड आणि ओव्हरलोड पद्धतीने शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर,जीव-घेण्या,अति-धोकादायक वाहतूकीवर आणि संबंधितांवर उल्हासनगर वाहतूक शाखा आणि उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून लवकरच संयुक्तपणे कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगून उल्हासनगर महानगर पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना ही सोबत घेऊन कडक कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक श्री विजय गायकवाड यांनी नमूद केले.
यावेळी मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष कैलाश वाघ,बादशहा शेख,उप-शहर अध्यक्ष राहुल वाकेकर,अमित फुंदे,जगदिश माने,हबीब शेख,साजिद शेख तसेच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment