उल्हासनगर - उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमा अंतर्गत सर्व दिव्यांग मुला-मुलींकरिता लवकरच थेरपी सेंटरची स्थापना उल्हासनगर क्षेत्रात होणार असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियान प्रमुख संगीता लहाने यांनी दिली.
उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी आढावा बैठक होणार असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियान प्रमुख संगीता लहाने यांनी दिली. सदर स्थापनेबाबत चर्चा करण्याकरिता आयएएस ऑफिसर सुरजीत रॉय हे दिल्लीवरून उल्हासनगर महानगरपालिकेत आगामी ८ डिसेंबर २०२२ रोजी उल्हासनगर शहरात येणार आहेत. सदरचे नियोजन वेदांत कॉलेज येथील प्राचार्य श्रीमती संगीता कोहली मॅडम यांनी केले आहे. पालिकेचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी मतिमंद विद्यार्थी वेदांत कॉलेज शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांची भेट घेतली असता सदर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समस्या जाणून घेतल्या व याबाबत आपण लवकरात लवकर थेरपी सेंटर व इतर सुविधा करिता प्रयत्न करू असे आश्वासन दिले. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ऑटीसम सेंटर, लर्निंग डिसिबिलिटी सेंटर, गार्डन, एम पी आर टी सी सेंटर इतर उपक्रम घेण्याबाबत समग्र शिक्षा विभागाने याबाबत सतत पाठपुरावा करण्यात लवकरच यश संपादन होणार आहे. एम पी आर टी सी ट्रेनिंग सेंटर करिता मनपा शाळा क्रमांक २० येथे जागा उपलब्ध करून मिळाली आहे यामध्ये तीन मजली बिल्डिंग लवकरच उभारण्यात येणार आहे. यामध्ये आदरणीय अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर यांनी मौलाचे सहकार्य केले आहे.
Post a Comment