उल्हासनगर - उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाच्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
आज ३ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक अपंग दिननिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी उपस्थित होते.
यावेळी उल्हासनगर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, दिव्यांग कल्याणकरी योजना विभागाच्या प्रमुख अलका पवार, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अचुत सासे, विधी विभागाचे विधी अधिकारी राजा बुलानी तसेच अपंग कल्याण महासंघाचे अध्यक्ष राजन साळवे, आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी दिव्याग व्यक्तींना आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते भेट वस्तू देण्यात आल्या.
Post a Comment