उल्हासनगर - उल्हासनगर मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी संजय राजगुरू यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
उल्हासनगर मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत सर्वसंमतीने संजय राजगुरु यांची निवड करण्यात आली आहे , जवळपास २२ वर्षांचा पत्रकारितेचा दिर्घ अनुभव असलेले राजगुरू यांचे सामाजिक क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे. संघाचे मावळते अध्यक्ष प्रमोद दळवी यांच्या हातून राजगुरु यांनी पदभार स्वीकारला, सुरेश चौहान यांची कार्याध्यक्षपदी तर सचिव पदी शिवाजी वाघ, आणि नंदकुमार चव्हाण (कोषाध्यक्ष) पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
यावेळी माजी अध्यक्ष रविन्द्र धांडे, पत्रकार नवनीत बऱ्हाटे, प्रमोद दलवी, दिनेश गोगी, प्रफुल्ल केदारे, गुलाब पवार, धर्मेंद्र दुबे , शिवाजी वाघ, सुनील इंगले, आकाश शहाणे, सोनु शिंदे, प्रकाश सोनावणे, महेश रोकड़े, आर.एस.वर्मा, स्वप्निल पाटिल, साम घोडगे आदी पत्रकार उपस्थित होते.
Post a Comment