उल्हासनगर शहराच्या हद्दीत ठरवून दिलेल्या वेळेतच अवजड वाहनांनी वाहतूक करणे बंधनकारक असतांना,सर्वच नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून अवजड आणि ओव्हरलोड पद्धतीने शहरातील रस्त्यांवर अशी बेकायदेशीर आणि धोकादायक वाहतूक सुरू असल्याने,तसेच शहरातील रहदारीच्या वेळेस या अवजड आणि ओव्हरलोड वाहनांनी बेकायदेशीरपणे शहरात प्रवेश करून याच वाहनांनी अनेकांना चिरडले आहे,याच ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळन झालेली आहे,शिवाय वाहतूकीचा ही खोळंबा होत आहे.
वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करून कायदा मोडणाऱ्या आणि ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर तसेच रस्त्यांच्या दुतर्फा विक्री करण्यासाठी उभ्या असलेल्या आणि वाहतुकीला अडथळा करणाऱ्या जुन्या गाड्यांवर ही तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.
तसेच आठवड्याभरात या महत्वपूर्ण विषयावर उल्हासनगर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या शहर शाखेच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष श्री काळू थोरात यांनी दिलेला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी,विभाग अध्यक्ष कैलास वाघ,बादशहा शेख,विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे,विभाग अध्यक्ष मधुकर बागुल,वाहतूक सेनेचे उप शहर अध्यक्ष राहुल वाकेकर,विभाग अध्यक्ष महेश साबळे,शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर,रवी बागुल,नरेश गायकवाड तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment