उल्हासनगर—
उल्हासनगर महापालिकेची उल्हासनगर - ५ मध्ये गेल्या ४० ते ४५ वर्षा पासून शाळा क्रमांक १९ व २२ ही शाळा आहे व या शाळेच्या समोर शाळेच्या मालकीच एक मोठं मैदान आहे.या शाळेला लागूनच बी.जी. टिळक ही शाळा सुद्धा आहे.परंतु या शाळेला मैदान नाही.बी.जी.टिळक शाळेची मागची बाजू ही शाळा क्रमांक १९/२२ च्या मैदानाला लागूनच असल्याने शाळा प्रशासनाने काही वर्षापूर्वी अगोदर आपली भिंत तोडून या मैदानाच्या बाजूने एक छोटा रस्ता तयार केला व काही वर्षापूर्वी या रस्त्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हरकत घेतली होती तर तेव्हा शाळा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपाचा आहे.परंतु कालांतराने बी.जी.टिळक शाळेच्या प्रशासनाने या मैदानाचे खोटे कागदपत्रे तयार करून हया मैदानाच्या जगेवर स्वतःच्या नावाने सनद काढल्याची माहिती समोर येत आहे.उल्हासनगर शहरात सरकारी भूखंडाचे खोटे कागदपत्र तयार करून सनद प्राप्त करने काही नवीन नाही.आपले कार्यालय व आपले अधिकारी कागदपत्राची शहाणीशा न करता किंवा जागेची प्रत्यक्ष पाहणी न करताच सनद देतात ही गंभीर बाब आहे असा आरोप शहर अध्यक्ष बंडू देशमुख व जिल्हा सचिव संजय घुगे यांनी केला आहे.खोट्या कागदपत्राच्या आधारे देण्यात आलेली ही सनद रद्द करून महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गोर-गरीब विद्यार्थ्यांना त्यांचं मैदान परत कराव अशी मागणी शहर अध्यक्ष बंडू देशमुख व मनविसेचे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी उपविभागिय अधिकारी जयराज कारभारी व भू-मापन अधिकारी राठोड यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मानविसेचे जिल्हा संघटक मनोज शेलार, मा. सचिव तन्मेश देशमुख विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे उपस्थित होते.
Post a Comment