जन-सामान्यांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी मनसेचे धरणे आंदोलन.






 

उल्हासनगर:

     प्रभाग समिती क्रमांक-१ मध्ये सर्वच रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे,

       शहाड स्टेशन परिसर,गुलशन नगर,उल्हासनगर-१ बस स्थानक परिसर,सेंच्युरी नाका ते खेमानी मच्छी मार्केट रस्त्यावरील जीवघेणे खड्डे,  

          भोसले हॉस्पिटल ते बिर्ला मंदिर रस्त्यावर तर दररोज दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत,लोकं दुखापतग्रस्त, जायबंदी होत आहेत,

       २३/२६ शाळेची दुरुस्ती, शाळे जवळील एम एम आर डी ए च्या  शौचालयाची दुरुस्ती या सर्व प्रभागातील समस्यांच्या संदर्भात उल्हासनगर महानगर पालिकेच्या पाणी-पुरवठा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही जन-सामान्यांच्या समस्यांवर कसलाच तोडगा त्यांच्याकडून काढला जात नसल्याने तसेच

       जुन्या,जीर्ण झालेल्या जलवाहिन्या फुटून पाणी रस्त्यावर वाहत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे,                   

            तानाजीनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने परिसरातील नागरिक हैराण आहेत,मागील काही महिन्यांपासून परिसरातील महिला वर्ग या त्रासाल सामोरा जातोय.

             चुकीच्या,बोगस,निकृष्ट दर्जाच्या कामांची पाठराखण अधिकाऱ्यांकडून केली जाते, परंतु जनसामान्यांसाठी अति-आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य दिले जात नसल्याने, जनसामान्य आणि गोर-गरीब जनतेच्या मूलभूत गरजा,त्यांच्या समस्यांवर उल्हासनगर महानगर पालिकेच्या संबंधित विभागाने तात्काळ तोडगा काढावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी आणि परिसरातील त्रस्त नागरिकांचे तानाजीनगर,एम आय डी सी रोड,उल्हासनगर-१ याठिकाणी आज मंगळवार,दिनांक ०१/११/२०२२ रोजी सकाळी ११ वा. पासून एक दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात झाली,मनसेच्या शहरातील सर्वच मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि प्रभागातील नागरिकांनी या धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला.

   प्रभागातील जन-सामान्यांना मिळत नसलेल्या मूलभूत सुविधा आणि मनसेच्या न्याय्य मागण्या या सर्वांची उल्हासनगर महानगर पालिकेच्या संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन लवकरात लवकर या समस्या दूर केल्या जाणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

               या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र सर-चिटणीस श्री राजनजी शितोळे साहेब,संयुक्त सर-चिटणीस सागर चाळसे, मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,जिल्हा सचिव संजय घुगे,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख, विध्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी,कल्पेश माने, वाहतूक सेनेचे काळू थोरात,राहुल वाकेकर,महेश साबळे,विभाग अध्यक्ष कैलास वाघ,प्रमोद पालकर आणि मनसेचे ईतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला,पुरुष या धरणे आंदोलनाला उपस्थित होते.





Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget