उल्हासनगर -
राजेंद्रसिंह भुल्लर यांच्या प्रयत्नाला यश साधू वासवनी पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी बाळासाहेबांची शिवसेना उल्हासनगर शहरप्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी साधू वासवनी पुतळ्या च्या सुशोभिकरणा साठी ७५ लाखाचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे.यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडून ७५ लाखांच्या निधिची मागणी केली असता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा निधी ताबडतोड मंजूर करून दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे सिंधी समुदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे.निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहिले असता बाळासाहेबांची शिवसेनेची ही महत्वाची कामगिरी मानली जात आहे.
Post a Comment