उल्हासनगर:
धर्मविर आनंद दिघे साहेब चौकातील प्रसादन गृह महापालिकेने कोणतीही पुर्व कल्पना न देता रस्ता रुंदीकरणासाठी तोडलं या चौकात पासून लांबलांब पर्यंत प्रसादन गृह नसल्यामुळे व्यपारी व नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत होती. काही व्यपारी व नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे या बाबत तक्रारी केल्यानंतर मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत लवकरच या ठिकाणी नवीन प्रसादानगृह तयार करण्यात येणार आहे.महापालिकेचे उपअभियंता अश्विनी यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह जागेची पाहणी केली व लेखी अश्वासन दिले की लवकरच प्रसाधानगृह नव्याने बांधून देणार यावेळी शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसेचे जिल्हा संघटक मनोज शेलार,उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव,उपविभाग अध्यक्ष गणेश आठवले,महाराष्ट्र सैनिक रवी अहिरे, राज,यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment