उल्हासनगर:
आज उल्हासनगर -५ शासकीय वसतिगृहातील मूकबधिर,अनाथ तसेच दिव्यांग आणि शारिरीक तसेच मानसिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या शासकीय अपंग मुलांच्या बालगृहातील लहान मुलांबरोबर उल्हासनगर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली,
मनसेचे उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव तसेच शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्य संकल्पेनेतून हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला.मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे यांचेही सहकार्य या सत्कार्यात लाभले.
समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना सहकार्य करणे हा आपला उद्देश असल्याचे शैलेश पांडव आणि मैनुद्दीन शेख यांनी सांगितले.
डोक्यावर पालकांच्या मायेचे छत्र नसलेल्या या शासकीय अपंग मुलांसोबत बालगृहात जाऊन दिवाळी साजरी केल्याने,त्यांना दिवाळीच्या फराळाचे २ घास चारून,नेहमीच्या आहारापेक्षा थोडेसे वेगळे स्वादिष्ट व्यंजन भरवून,नवीन कपडे भेट म्हणून दील्याने या मुलांचा आनंद द्विगुणित झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आपल्या कार्याची पोहोचपावती असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव,म न वि से चे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी,उल्हासनगर माथाडी सेनेचे सर-चिटणीस संजय नार्वेकर,विभाग अध्यक्ष बादशहा शेख,उप-विभाग अध्यक्ष विष्णू जाधव तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment