कल्याण:
कल्याण ग्रामीण भागातील युवा समाजसेवक निकेत सखाराम व्यवहारे यांचा वाढदिवस सामजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी आरोग्य शिबिरास मोठया संख्येने नागरिकांनी लाभ घेतला २५० ते ३०० नागरिकाचे ईसीजी, डोळे तपासणी, सुगर, असे अनेक तपासण्याचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे संपूर्ण नियोजन डॉ. सनी सिंग तसेच सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल आणि साई ऑप्टिक, श्री समर्थ मित्र मंडळ, श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ, श्री गणराज मित्र मंड, म्हारळ शिवसेना शाखा यांचे सहकार्य लाभले. या वेळी उपस्थित म्हारळ शहर प्रमुख प्रकाश चौधरी आणि पत्रकार बांधव तसेच वार्ड क्रमांक ०३ मधील नागरिक उपस्थित होते.
Post a Comment