प्रतिनिधी / उल्हासनगर : उल्हासनगर कॅंप ३ येथिल संजय गांधी नगर ला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करन्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे गजानन शेळके जमील खान शिवाजी रगडे फिरोझ खान यानी आयुक्ताना दिलेल्या निवेदनात केली आहे . सदर पुल तोडुन काही महिने झाले असुन रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या प्रवाशी , विद्यार्थी आणि वाहन चालक यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत .
उल्हासनगर कॅंप ३ येथिल संजयगांधी नगर कडे जाणारा वालधुनी नदीवरील पुल धोकादायक झाल्यामुळे महापालिकेने पावसाळ्या पुर्वीच तोडला आहे . हा पुल तोडल्यामुळे प्रवाशी , विद्यार्थी आणि वाहन चालक यांचे हाल होत आहेत . दरम्यान आता पावसाळा संपला असुन त्या पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करन्यात यावे . कारण सी एच एम कडुन रेल्वे स्टेशन कडे जाणारा पुल सुध्दा धोकादायक झाला असुन त्याच पुलावरुन प्रवाशी , विद्यार्थी आणि वाहने जात आहेत . दरम्यान या पुर्वी वडोलगांव च्या पुलाला सुध्दा बराच विलंब झाला होता . मात्र आंदोलनाच्या पवित्र्यामुळे तो पुल तयार झाला आहे . तेव्हा संजय गांधी नगर कडे जाणाऱ्या या पुलाच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरवात करावी अशी मागणी माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे व राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते शिवाजी रगडे गजानन शेळके जमील खान फिरोझ खान यानी आयुक्ताना दिलेल्या निवेदनात केली आहे . जर का १५ दिवसात पुलाच्या कामाला सुरवात झाली नाही तर तीव्र आंदोलन करन्यात येणार असल्याचा इशारा शिवाजी रगडे यानी दिला आहे .
Post a Comment