उल्हासनगर:
गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक निर्णय घेतलेला होता आणि या निर्णयानुसार रेशन दुकानांवर रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा, एक किलो पाम तेल,एक किलो चना डाळ, एक किलो साखर अश्या चार वस्तू १०० रुपयांमध्ये भेटणार असे शासनाकडून सांगण्यात आलेले होते,मोठं-मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या परंतु दिवाळी आठ दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना देखील अजून रेशन दुकानांवर अशी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांनी दुकानांवर जाऊन संबंधित वस्तूंबद्दल विचारणा केली असता अश्या कोणत्याच वस्तू उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर शिधापत्रिका धारकांना रिकाम्या हाताने निराश होऊन परतावे लागत आहे,शासनाने घेतलेला हा निर्णय कागदावरचं न ठेवता तो तात्काळ अंमलात आणावा,दिवाळीच्या सणा अगोदर या वस्तू शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करून दयाव्यात अशी मागणी करत उल्हासनगर मनसे कडून येथील शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांना वरील चार वस्तूंचे किट दिवाळी भेट म्हणून देण्यात आले. यामार्फत जनसामान्यांच्या भावना महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचाव्या आणि लवकरात लवकर हे किट रेशन दुकानांवर उपलब्ध व्हावे असा आपला उद्देश असल्याचे मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष बादशहा शेख,राहुल वाकेकर,अमित फुंदे,जितू शेट्टी तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment