उल्हासनगर:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने उल्हासनगर - ५ मधील महिला व बाल कल्याण विभागाच्या १८ वर्षा खालील मुलींच्या महिला निरीक्षण गृहातील मुलीनं सोबत मनसे पदाधिकाऱ्यांनी भाऊबीज साजरी केली.प्रत्येकाला चांगल आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.दोन वर्षाच्या कोविड काळानंतर पहिल्यांदाच या वर्षी सर्वांनीं मनमोकळे पणाने दिवाळीचा सण साजरा करता आला व या निरीक्षण गृहातील मुलींना सुद्धा दिवाळीचा आनंद घेता यावा.त्यांची भाऊबिज चांगली व्हावी म्हणून या सुधार गृहातील ३० ते ३५ मुलींना मनसेच्या वतीने नवीन कपडे,फराळ व मिठाई देऊन या मुलींन सोबत मनसे पदाधिकाऱ्यांनी भाऊबीज साजरी केली तेव्हा या मुलींचा आंनद गगनात मावेनासा झाला या मुलींच्या आंनदात आम्हाला सहभागी होता आलं हिच आमची खरी दिवाळी असल्याचे बंडू देशमुख व मनोज शेलार यांनी सांगितले.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार,उपशहर अध्यक्ष ऍड.अनिल जाधव,शैलेश पांडव,मुकेश सेठपलांनी,सुभाष हटकर,मनविसेचे तन्मेष देशमुख,विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे, सागर चौहान,अनिल गोधडे,उपविभाग अध्यक्ष गणेश आठवले तसेच सचिन शेलार,रवी अहिरे,रवि सोनावणे,लड्डन रेन,विभाग अध्यक्षा विशाखा गोधडे,शाखा अध्यक्षा सोनीताई कागडा,ज्योती वाघ,पूनम मनोज शेलार,उमा जाधव,निर्मला विजय बनसोडे,शकुंतला सांवत,ईमलाबाई जाधव,सुमन कोळेकर,अश्विनी नायकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment