कल्याण:
म्हारळगावातील सामाजिक संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हारळ शाखेच्या वतीने हिंदुत्वाचा ज्वलंत दिवा कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि सीमेवर रक्षण करताना शहीद झालेल्या जवान तसेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक निकेत सखाराम व्यवहारे म्हारळ शहर प्रमुख. प्रकाश चौधरी, उपशहर प्रमुख.यशवंत देशमुख, विभाग प्रमुख.देवानंद म्हात्रे, उपशहर संघटक मधुकर देशमुख,विशाल देशमुख, संतोष सूर्यराव,नाना जगताप, बाळा गलांडे,शेखर गाडे, प्रकाश सूर्यराव, आणि एम.आय.डी.सी.रिक्षा चालक-मालक संघटनेचे सभासद व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
Post a Comment