उल्हासनगर:
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कल्याण ग्रामीण भागातील स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम द्वितीय तृतीय असे पाच पारितोषिक आणि सन्मान चिन्ह विजेत्यांना देण्यात येणार आहे.म्हारळ विभाग आणि वरप विभाग दोन्ही गावात ही स्पर्धा आयोजित केली आहे. आयोजक स्व.रोहित भाई भोईर प्रतिष्ठानचे सभासद महेश शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षक निकेत सखाराम व्यवहारे आणि आवी सुक्रे यांच्या नियोजनअंतर्गत स्पर्धा होणार आहे. दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वा. किल्ले परिक्षणाला सुरुवात होईल. किल्ले स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरण डिसेंबर महिन्यात होणाऱ्या कल्याण ग्रामीण भागातील भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा स्व.रोहित भाई भोईर चषक मध्ये अंतीम दिवस ४ डिसेंबर २०२२ रोजी सीमा रिसॉर्ट ग्राउंड वरप येथे होणार आहे.
Post a Comment