उल्हासनगर - मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगर महानगर पालिका प्रशासन झोपेतून खडबडून जागे झाले आणि रस्त्याचे व नाल्याचे काम सुरू करण्यात आले.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर महानगर पालिका प्रभाग क्रमांक ३ मधील बाळकृष्ण नगर, राजीव गांधी नगर या ठिकाणी रस्त्त्यांची तसेच नाल्यांची बऱ्याच वर्षा पासून मोठया प्रमाणात दूरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांशी सामना करावा लागत होता. तसेच महापालिकेचे माझी नगरसेवक यांचा कालावधी संपल्याने त्यांनीही नागरिकांच्या समस्येकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव संजय घुगे यांनी पुढाकार घेऊन सातत्याने पालिका प्रशासनाला पाठपुरावा करून सदर रस्त्याच्या व नाल्यांचे काम स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून सुरू केले. रस्त्याचे आणि नाल्यांचे काम सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment