उल्हासनगर:
उल्हासनगर ५ मध्ये महिला बाल-कल्याण विभागचे महिला सुधारगृह कार्यरत आहे.या सुधार गृहातील जवळपास ६० मुली गेल्या एक महिन्या पासून अंधारात राहत होत्या.प्रशासना कडून सहा ते सात महिन्याच वीज बिल थकल्यामुळे वारंवार नोटीस देऊन सुद्धा विजबिल भरलं जात नव्हतं म्हणून महावितरण कडून हा विज पुरवठा एक महिन्यापूर्वी खंडित करण्यात आला होता.या सुधार गृहात १८ वर्षा खालील मुलींना ठेवण्या येते.या सुधार गृहात मूलभूत सुविधा तर सोडाच साधी लाईटही नव्हती.या सुधार गृहाच्या परिसरात मोठया प्रमाणात झाडं-झूडप उगवली असून घाणीचे साम्राज्य पण मोठया प्रमाणात पसरले आहे.यामुळे या सुधार गृहातील मुलींच्या सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.गेले कित्येक दिवसा पासून या सर्व गोरगरीब मुली अंधारात राहत आहेत,तसेच ICDS एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय मध्ये तसेच महिला संरक्षण विभाग मध्ये ही गेल्या 30 दिवसा पासून विद्युत पुरवठा खंडित केला असल्याने सर्व काम.काग बंद असल्याचे समोर आले आहे.काल ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांना समजताच त्यानीं ही प्रधानसचिव महिला व बालविकास मंत्रालय मुंबई,जॉईन सेक्रेटरी अहिरे महिला व बालविकास, मुख्यमंत्र्यांचे स्वियसाहायक सोनावणे,सुधार गृहाच्या जाधव यांना संपर्क करून संद्याकाळ पर्यंत हा विज-पुरवठा सुरळीत करून घेतला. यावेळी मनविसे तन्मेश देशमुख,महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा शशिकला साळवे,शाखा अध्यक्ष सोनी कागडा,जोती वाघ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment