उल्हासनगर - माजी राष्ट्रपती स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने उल्हासनगर महानगर पालिकेने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस' वाचन प्रेरणा दिन 'म्हणून साजरा केला.
दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी माजी राष्ट्रपती स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस' वाचन प्रेरणा दिन 'म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगर ३ येथे साजरा करण्यात आला. सदर 'वाचन प्रेरणा दिन' दिनानिमित्त माननीय आयुक्त श्री अजिज शेख उपस्थित होते. आयुक्त श्री अजिज शेख यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी याकरिता मार्गदर्शन केले. तसेच समग्र शिक्षा अंतर्गत कर्मचारी, अभ्यासिके मधील कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण विभागातील कर्मचारी यांनी कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास तरी वाचनाकरिता द्यावा असे आवाहन केले.
यावेळी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी श्री हेमंत शेजवळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भास्कर शिंदे यांनी केले. तसेच कार्यक्रमांमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत सर्व कर्मचारी, शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी, अभ्यासिकेतील कर्मचारी उपस्थित होते. सदरचा वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाला पालिका आयुक्त अजीज शेख हे आवर्जून उपस्थित होते अशी माहिती (जिल्हा /मनपा समन्वयक समग्र शिक्षा अभियान)एड. श्रीमती संगीता लहाने -काळे यांनी दिली
Post a Comment