उल्हासनगर:
अखिल भारतीय जिवा सेना उल्हासनगर तालुका आणि शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक प्रतापगडावरील रणसंग्रामात स्वराज्यावर चालून आलेल्या संकटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून "होता जिवा,म्हणून वाचला शिवा"या गौरवोद्गाराने इतिहासात अजरामर झालेले शिवरत्न जिवा महाले यांची ३८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
उल्हासनगर शहरातील वीर जिजामाता उद्यान,मराठा सेक्शन -३२ मधील शिवसृष्टितील बाल शिवाजी आणि जिजाऊ यांच्या स्मारकाला वंदन करून शिवरत्न जिवा महाले यांच्या भिंती शिल्पाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्र सांवत आणि अखिल भारतीय जिवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख मनोज कोरडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी वीर भाई कोतवाल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रावताळे,सचिव एम.आर.निकम,कोषाध्यक्ष अशोक जगताप,कार्याध्यक्ष राजन चव्हाण,सदस्य लक्ष्मण दळवी आणि नाभिक समाजबांधव उपस्थित होते.अखिल भारतीय जिवा सेनेचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष मंगेश सायखेडे आणि उल्हासनगर शहर अध्यक्ष संतोष खंडागळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप सायखेडे, अंकुश श्रीखंडे,सोनु चावके,सतीश महाले,संदिप रावताळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
Post a Comment