October 2022

 






छट पूजा बडेही उत्साह के साथ संपन्न..

हर साल की तरह इस साल भी बडे उमंग से छट पूजा का कार्यक्रम संपन्न हुवा इस कार्यक्रम मे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीके प्रवक्ता शिवाजी रगडे, जमील खान, फिरोज खान, माजी नगरसेवक गजानन शेळके,महेश आहुजा, सीमा आहुजा,सुमन शेळके,और सभी उत्तर भारतीय मंच की तरफ से यह कार्यक्रम आयोजित किया गया था।

इस कार्यक्रम मे पूर्व आमदार पप्पू कलानी साहेब,  राजेश सोनी, दशरथ खान, लल्लू शर्मा, परमानंद एमपी शर्मा, सुरज शर्मा, रवी शर्मा, स्वामी शरण, अभिषेक सिंग, पप्पू यादव, आदिनाथ पालवे, विनोद गुप्ता करे, गुप्ता महेंद्र शर्मा, अर्जुन गुप्ता, गुड्डू शर्मा, संजय शर्मा, समशेर शर्मा, जगदीश सिंग, अभिषेक पालवे, अरुण शर्मा, विकास शर्मा, जय किशोर, अरविंद शर्मा, सुरेश चव्हाण तथा सभी नेतागण उपस्तीत थे।


कार्यक्रम मे पॅनल की सभी महिलाये बडी संख्या मे उपस्थित रह कर पूजा की।









 











उल्हासनगर:

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने उल्हासनगर - ५ मधील महिला व बाल कल्याण विभागाच्या १८ वर्षा खालील मुलींच्या महिला निरीक्षण गृहातील मुलीनं सोबत मनसे पदाधिकाऱ्यांनी भाऊबीज साजरी केली.प्रत्येकाला चांगल आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.दोन वर्षाच्या कोविड काळानंतर पहिल्यांदाच या वर्षी सर्वांनीं मनमोकळे पणाने दिवाळीचा सण साजरा करता आला व या निरीक्षण गृहातील मुलींना सुद्धा दिवाळीचा आनंद घेता यावा.त्यांची भाऊबिज चांगली व्हावी म्हणून या सुधार गृहातील ३० ते ३५ मुलींना मनसेच्या वतीने नवीन कपडे,फराळ व मिठाई देऊन या मुलींन सोबत मनसे पदाधिकाऱ्यांनी भाऊबीज साजरी केली तेव्हा या मुलींचा आंनद गगनात मावेनासा झाला या मुलींच्या आंनदात आम्हाला सहभागी होता आलं हिच आमची खरी दिवाळी असल्याचे बंडू देशमुख व मनोज शेलार यांनी सांगितले.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार,उपशहर अध्यक्ष ऍड.अनिल जाधव,शैलेश पांडव,मुकेश सेठपलांनी,सुभाष हटकर,मनविसेचे तन्मेष देशमुख,विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे, सागर चौहान,अनिल गोधडे,उपविभाग अध्यक्ष गणेश आठवले तसेच सचिन शेलार,रवी अहिरे,रवि सोनावणे,लड्डन रेन,विभाग अध्यक्षा विशाखा गोधडे,शाखा अध्यक्षा सोनीताई कागडा,ज्योती वाघ,पूनम मनोज शेलार,उमा जाधव,निर्मला विजय बनसोडे,शकुंतला सांवत,ईमलाबाई जाधव,सुमन कोळेकर,अश्विनी नायकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









कल्याण:

       म्हारळगावातील सामाजिक संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हारळ शाखेच्या वतीने हिंदुत्वाचा ज्वलंत दिवा कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि सीमेवर रक्षण करताना शहीद झालेल्या जवान तसेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची  महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक निकेत सखाराम व्यवहारे म्हारळ शहर प्रमुख. प्रकाश चौधरी, उपशहर प्रमुख.यशवंत देशमुख, विभाग प्रमुख.देवानंद म्हात्रे, उपशहर संघटक मधुकर देशमुख,विशाल देशमुख, संतोष सूर्यराव,नाना जगताप, बाळा गलांडे,शेखर गाडे, प्रकाश सूर्यराव, आणि एम.आय.डी.सी.रिक्षा चालक-मालक संघटनेचे सभासद व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.




 






उल्हासनगर:


  आज उल्हासनगर -५ शासकीय वसतिगृहातील मूकबधिर,अनाथ तसेच दिव्यांग आणि शारिरीक तसेच मानसिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या शासकीय अपंग मुलांच्या बालगृहातील लहान मुलांबरोबर उल्हासनगर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली,

   मनसेचे उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव तसेच शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्य संकल्पेनेतून हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला.मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे यांचेही सहकार्य या सत्कार्यात लाभले.

   समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना सहकार्य करणे हा आपला उद्देश असल्याचे शैलेश पांडव आणि मैनुद्दीन शेख यांनी सांगितले.

  डोक्यावर पालकांच्या मायेचे छत्र नसलेल्या या शासकीय अपंग मुलांसोबत बालगृहात जाऊन दिवाळी साजरी केल्याने,त्यांना दिवाळीच्या फराळाचे २ घास चारून,नेहमीच्या आहारापेक्षा थोडेसे वेगळे स्वादिष्ट व्यंजन भरवून,नवीन कपडे भेट म्हणून दील्याने या मुलांचा आनंद द्विगुणित झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आपल्या कार्याची पोहोचपावती असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

   यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव,म न वि से चे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी,उल्हासनगर माथाडी सेनेचे सर-चिटणीस संजय नार्वेकर,विभाग अध्यक्ष बादशहा शेख,उप-विभाग अध्यक्ष विष्णू जाधव तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






 


         

उल्हासनगर:

      दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कल्याण ग्रामीण भागातील स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम द्वितीय तृतीय असे पाच पारितोषिक आणि सन्मान चिन्ह विजेत्यांना देण्यात येणार आहे.म्हारळ विभाग आणि वरप विभाग दोन्ही गावात ही स्पर्धा आयोजित केली आहे. आयोजक स्व.रोहित भाई भोईर प्रतिष्ठानचे सभासद महेश शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षक निकेत सखाराम व्यवहारे आणि आवी सुक्रे यांच्या नियोजनअंतर्गत स्पर्धा होणार आहे. दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वा. किल्ले परिक्षणाला सुरुवात होईल. किल्ले स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरण डिसेंबर महिन्यात होणाऱ्या कल्याण ग्रामीण भागातील भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा स्व.रोहित भाई भोईर चषक मध्ये अंतीम दिवस ४ डिसेंबर २०२२ रोजी सीमा रिसॉर्ट ग्राउंड वरप येथे होणार आहे.










उल्हासनगर:

दीपावली उत्सव खुशियों का त्यौहार होता है इसको ध्यान मे रखते हुए शहर की पूर्व उप महापौर व  बालकन जी बारी हाय स्कूल व जूनियर कॉलेज की प्रबंधक जया मोहन साधवानी मैडम,असिटेंट एडमिनिस्टेटिव एकता मैडम,व पूर्व नगरसेवक मोहन साधवानी जी ने आज टीचिंग व नान टीचिंग १२५ स्टाफ को दिवाली बोनस देने का स्कूल मे कार्यक्रम आयोजित किया गया था.इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप मे हिल लाइन पुलिस स्टेशन के सीनियर पी.आय.रणजीत डेरे जी,पत्रकार दबंग दिलीप मिश्रा,पत्रकार कृष्णा लालवानी व डॉक्टर अशोक रोहड़ा जी मौजूद थे.सभी टीचारों को  बोनस स्वरुप मानधन,ब्लैंकेट व मिठाई के रूप मे नमकीन देकर उन्हे गौरवनित किया गया।असिटेंट एडमिनिस्टेटिव एकता मैडम द्वारा जब से स्कूल की बागडोर अपने हाथों मे ली है तब से बालकन जी बारी स्कूल तेजी से आगे बढ़ रहा है।








प्रतिनिधी / उल्हासनगर : उल्हासनगर कॅंप ३ येथिल संजय गांधी नगर ला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर  सुरु करन्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे गजानन शेळके जमील खान शिवाजी रगडे फिरोझ खान  यानी आयुक्ताना दिलेल्या निवेदनात केली आहे . सदर पुल तोडुन काही महिने झाले  असुन रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या प्रवाशी , विद्यार्थी आणि वाहन चालक यांचे  मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत . 


उल्हासनगर कॅंप ३ येथिल संजयगांधी नगर कडे जाणारा वालधुनी नदीवरील पुल धोकादायक झाल्यामुळे महापालिकेने पावसाळ्या पुर्वीच तोडला आहे . हा पुल तोडल्यामुळे प्रवाशी , विद्यार्थी आणि वाहन चालक यांचे हाल होत आहेत . दरम्यान आता पावसाळा संपला असुन त्या पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करन्यात यावे . कारण सी एच एम कडुन रेल्वे स्टेशन कडे जाणारा पुल सुध्दा धोकादायक झाला असुन त्याच  पुलावरुन प्रवाशी , विद्यार्थी आणि वाहने जात  आहेत  . दरम्यान या पुर्वी वडोलगांव च्या पुलाला सुध्दा बराच विलंब झाला होता . मात्र आंदोलनाच्या पवित्र्यामुळे तो पुल तयार झाला आहे . तेव्हा  संजय गांधी नगर कडे जाणाऱ्या या पुलाच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरवात करावी अशी मागणी माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे व राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते शिवाजी रगडे गजानन शेळके जमील खान फिरोझ खान यानी आयुक्ताना दिलेल्या निवेदनात केली आहे . जर का १५ दिवसात पुलाच्या कामाला सुरवात झाली नाही तर तीव्र आंदोलन करन्यात येणार असल्याचा इशारा शिवाजी रगडे यानी दिला आहे .





 


उल्हासनगर:



उल्हासनगर ५ मध्ये महिला बाल-कल्याण विभागचे महिला सुधारगृह कार्यरत आहे.या सुधार गृहातील जवळपास ६० मुली गेल्या एक महिन्या पासून अंधारात राहत होत्या.प्रशासना कडून सहा ते सात महिन्याच वीज बिल थकल्यामुळे वारंवार नोटीस देऊन सुद्धा विजबिल भरलं जात नव्हतं म्हणून महावितरण कडून हा विज पुरवठा एक महिन्यापूर्वी खंडित करण्यात आला होता.या सुधार गृहात १८ वर्षा खालील मुलींना ठेवण्या येते.या सुधार गृहात मूलभूत सुविधा तर सोडाच साधी लाईटही नव्हती.या सुधार गृहाच्या परिसरात मोठया प्रमाणात झाडं-झूडप उगवली असून घाणीचे साम्राज्य पण मोठया प्रमाणात पसरले आहे.यामुळे या सुधार गृहातील मुलींच्या सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.गेले कित्येक दिवसा पासून या सर्व गोरगरीब मुली अंधारात राहत आहेत,तसेच ICDS एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय मध्ये तसेच महिला संरक्षण विभाग मध्ये ही गेल्या 30 दिवसा पासून विद्युत पुरवठा खंडित केला असल्याने सर्व काम.काग बंद असल्याचे समोर आले आहे.काल ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांना समजताच त्यानीं ही प्रधानसचिव महिला व बालविकास मंत्रालय मुंबई,जॉईन सेक्रेटरी अहिरे महिला व बालविकास, मुख्यमंत्र्यांचे स्वियसाहायक सोनावणे,सुधार गृहाच्या जाधव यांना संपर्क करून संद्याकाळ पर्यंत हा विज-पुरवठा सुरळीत करून घेतला. यावेळी मनविसे तन्मेश देशमुख,महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा शशिकला साळवे,शाखा अध्यक्ष सोनी कागडा,जोती वाघ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





 





उल्हासनगर:


गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक निर्णय घेतलेला होता आणि या निर्णयानुसार रेशन दुकानांवर रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा, एक किलो पाम तेल,एक किलो चना डाळ, एक किलो साखर अश्या चार वस्तू १०० रुपयांमध्ये भेटणार असे शासनाकडून सांगण्यात आलेले होते,मोठं-मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या परंतु दिवाळी आठ दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना देखील अजून रेशन दुकानांवर अशी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांनी दुकानांवर जाऊन संबंधित वस्तूंबद्दल विचारणा केली असता अश्या कोणत्याच वस्तू उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर शिधापत्रिका धारकांना रिकाम्या हाताने निराश होऊन परतावे लागत आहे,शासनाने घेतलेला हा निर्णय कागदावरचं न ठेवता तो तात्काळ अंमलात आणावा,दिवाळीच्या सणा अगोदर या वस्तू शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करून दयाव्यात अशी मागणी करत उल्हासनगर मनसे कडून येथील शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांना वरील चार वस्तूंचे किट दिवाळी भेट म्हणून देण्यात आले.   यामार्फत जनसामान्यांच्या भावना महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचाव्या आणि लवकरात लवकर हे किट रेशन दुकानांवर उपलब्ध व्हावे असा आपला उद्देश असल्याचे मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी सांगितले.

  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष बादशहा शेख,राहुल वाकेकर,अमित फुंदे,जितू शेट्टी तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 





उल्हासनगर - माजी राष्ट्रपती स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने उल्हासनगर महानगर पालिकेने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस' वाचन प्रेरणा दिन 'म्हणून साजरा केला.

दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी माजी राष्ट्रपती स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस' वाचन प्रेरणा दिन 'म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगर ३ येथे साजरा करण्यात आला. सदर 'वाचन प्रेरणा दिन'  दिनानिमित्त माननीय आयुक्त श्री अजिज शेख उपस्थित होते. आयुक्त श्री अजिज शेख यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी याकरिता मार्गदर्शन केले. तसेच समग्र शिक्षा अंतर्गत कर्मचारी, अभ्यासिके मधील कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण विभागातील कर्मचारी यांनी कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास तरी  वाचनाकरिता द्यावा असे आवाहन केले.

यावेळी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी श्री हेमंत शेजवळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भास्कर शिंदे यांनी केले. तसेच कार्यक्रमांमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत सर्व कर्मचारी, शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी, अभ्यासिकेतील कर्मचारी उपस्थित होते. सदरचा वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाला पालिका आयुक्त अजीज शेख हे आवर्जून उपस्थित होते अशी माहिती (जिल्हा /मनपा समन्वयक समग्र शिक्षा अभियान)एड. श्रीमती संगीता लहाने -काळे  यांनी दिली







 







उल्हासनगर:


मिनाताई ठाकरे ( लालचक्की ) चौकातील जेष्ठनागरिक कट्यावर रात्रीचा खुप अंधार होतहोता.व याचा त्रास या ठिकाणी बसणाऱ्या जेष्ठ नागरिकांना होत होता.या जेष्ठनागरिकांच्या मागणी नुसार पाठपुरावा करून आज या ठिकाणी ३ पोल बसवण्यात आले. या नागरिकांच्या अजूनही काही मागण्या आहेत त्याही लवकरच पूर्ण केल्या जातील असे आश्वसन शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिले आहे..या साठी विभाग अध्यक्ष सागर चौहान,मनविसे तन्मेष देशमुख यांनी खुप मेहनत घेतली.









 




उल्हासनगर:


आज कालानी महल पर फॉलोवर लाइन के व्यापारीयों के साथ मीटिंग की गई। केबी रोड के व्यापारियों को  महानगर पालिका द्वारा नोटिस दिए गए हैं इस बाबत चर्चा की गई और व्यापारियों की सारी समस्या सुनी गई और आगे उनका हल निकालने का पूरा पूरा आश्वासन व्यापारी भाइयों को दिया गया। इस मौके पर श्री ओमी पप्पू कालानी , राजेश टेकचंदानी ,  अध्यक्ष जगदीश  तेजवानी,राजन चंद्रवंशी, कमलेश निकम ने व्यापारियों को पूरा आश्वासन दिया कि उनके साथ अन्याय  नहीं होने दिया जाएगा और जल्दी ही कमिश्नर / प्रशासक से बात करके इस विषय का हल निकाला जाएगा। 

 



उल्हासनगर:


अखिल भारतीय जिवा सेना उल्हासनगर तालुका आणि शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक प्रतापगडावरील रणसंग्रामात स्वराज्यावर चालून आलेल्या संकटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून "होता जिवा,म्हणून वाचला शिवा"या गौरवोद्गाराने इतिहासात अजरामर झालेले शिवरत्न जिवा महाले यांची ३८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


उल्हासनगर शहरातील वीर जिजामाता उद्यान,मराठा सेक्शन -३२ मधील शिवसृष्टितील बाल शिवाजी आणि जिजाऊ यांच्या स्मारकाला वंदन करून शिवरत्न जिवा महाले यांच्या भिंती शिल्पाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्र सांवत आणि अखिल भारतीय जिवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख मनोज कोरडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


याप्रसंगी वीर भाई कोतवाल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रावताळे,सचिव  एम.आर.निकम,कोषाध्यक्ष अशोक जगताप,कार्याध्यक्ष राजन चव्हाण,सदस्य लक्ष्मण दळवी आणि नाभिक समाजबांधव उपस्थित होते.अखिल भारतीय जिवा सेनेचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष मंगेश सायखेडे आणि उल्हासनगर शहर अध्यक्ष संतोष खंडागळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप सायखेडे, अंकुश श्रीखंडे,सोनु चावके,सतीश महाले,संदिप रावताळे यांनी मोलाचे सहकार्य केले.





 


कल्याण:

         कल्याण ग्रामीण भागातील युवा समाजसेवक निकेत सखाराम व्यवहारे यांचा वाढदिवस सामजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी आरोग्य शिबिरास मोठया संख्येने नागरिकांनी लाभ घेतला २५० ते ३०० नागरिकाचे ईसीजी, डोळे तपासणी, सुगर, असे अनेक तपासण्याचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे संपूर्ण नियोजन डॉ. सनी सिंग तसेच सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल आणि साई ऑप्टिक, श्री समर्थ मित्र मंडळ, श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ, श्री गणराज मित्र मंड, म्हारळ शिवसेना शाखा यांचे सहकार्य लाभले. या वेळी उपस्थित म्हारळ शहर प्रमुख प्रकाश चौधरी आणि पत्रकार बांधव तसेच वार्ड क्रमांक ०३ मधील नागरिक उपस्थित होते.





 





उल्हासनगर:

इस्लाम धर्माचे सर्वश्रेष्ठ असे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मुस्लिम कालगणना रबीउल अव्वल महिन्याच्या बारा तारखेला साजरा करण्यात येतो. ई.स. ५७१ ला हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का येथे झाला. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी,रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाम मध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानले जाते.

 ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. या दिवशी अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. इस्लाम धर्मातील मान्यतेनुसार पैगंबर हजरत मोहम्मद हे अखेरचे संदेशवाहक आणि सर्वात महान होते. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी नेहमी शांततेचा संदेश दिला. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.

 ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधव मशिदीमध्ये यानिमित्ताने विशेष प्रार्थना करतात.तसेच मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचे स्मरण देखील करतात. तर काही ठिकाणी भव्य मिरवणुका निघतात. या सणाच्या निमित्ताने नागरिक नमाज अदा करून गोरगरिबांना मदत करणे,अन्नदान करणे त्याच पद्धतीने कुराण पठण ही करतात.

मोहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच शांततेचा संदेश दिला आहे. सत्य आणि अहिंसेची शिकवण ही नेहमीच मोहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. त्यांच्या या शिकवणीची आठवण आणि त्यांनी दिलेल्या कुराणची शिकवण ही सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात राहावी आणि त्यांनी आपल्या जीवनात ती अमलात आणावी यासाठी या दिवशी त्याचे पठण आणि शिकवण दिली जाते.

उल्हासनगर शहरात ही मुस्लिम बांधवांकडून ईद-ए-मिलाद निमित्त जुलूम काढण्यात आले,अन्नदान आणि सरबत चे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे मनसेचे शहर संघटक तसेच अहलेवतन मुस्लिम सामाजीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मैनुद्दीन भाई शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून गोर-गरिबांना अन्नदान करण्यात आले.

 यावेळी बादशहा शेख,वशीम शेख,रियाझ शेख,सोनू शेख,जाफर शेख,तसेच मनसेचे काळू थोरात,राहुल वाकेकर,कल्पेश माने,संजय नार्वेकर,जितू शेट्टी व ईतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget