उल्हासनगर:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र विधानसभेतील एकमात्र शिलेदार आणि आमचे लाडके राजू दादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील सामान्य कुटुंबातील परंतु उच्च शिक्षणाची आवड असणाऱ्या ६ होतकरू मुलांची संगणक प्रशिक्षणासाठी संस्थेकडून आकारली जाणारी फी ही मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्याकडून भरली जाणार आहे,तसेच संगणक प्रशिक्षण संस्थेकडून शिकविल्या जाणाऱ्या महत्वाच्या कोर्सेस चा यामध्ये समावेश असल्याने या मुलांना संगणकाचे ज्ञान मिळणार आहे तसेच कोठेही रोजगार मिळणे सोपे होणार आहे आणि यामुळे कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लागणार असल्याने तसेच परिसरातील कुटुंबांना या महत्वकांक्षी उपक्रमाचा लाभच भेटणार असल्याने आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च करून उगीचच चमकेशगिरी न करता आपल्या सत्कार्यातून आपल्या नेत्याला उदंड आयुष्यासाठी जन-सामान्यांचे आशीर्वाद लाभावे हाच प्रामाणिक उद्देश होता आणि या आपल्या उपक्रमामुळे संबंधित कुटुंबियांनी आनंद व्यक्त केलेला असल्याने आपला उद्देश पूर्ण झाल्याचे आपल्याला समाधान आहे असे मैनुद्दीन शेख यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment