उल्हासनगर शहरात राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी सहा वर्षा पूर्वी ७ करोड रुपये निधी देऊन सिधी बांधवांसाठी सिधुभवन बंधू बांधलं. आता उत्तर भारतीयांच्या मातांवर डोळा ठेऊन उत्तर भारतीय भवन बांधण्याची चर्चा सुरु झालीय. उल्हासनगर शहराला तिन आमदार आहेत मग या आमदारांना मराठी माणसं मतदान करीत नाहीत का. का मराठी माणसांना गृहीत धरलं जात याच उत्तर या आमदारांना येत्या महापालिकेच्या निवडूणुकित दयावच लागेल.. उल्हासनगर शहरात एक सुसज्य मराठी भवन बांधल्यास गोर-गरीब नागरिकांना याचा फायदा होईल या नागरिकांना आपल्या घरचे छोटे मोठे कार्यक्रम अत्यअल्प दरात करता येथील. मराठी संस्कृती संबंधी माहिती येथे उपलब्ध करून देता येईल. मराठी भाषा व मराठी संस्कृती जपण्यासाठी या मराठी भवनचा उपयोग होऊ शकतो. एक सुसज्य मराठी भवन बांधण्यात यावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २०१९ पासून पाठपुरावा करीत आहे. व करत राहील.
Post a Comment