कल्याण: कल्याण ग्रामीण भागातील म्हारळगावात श्री समर्थ मित्र मंडळाच्या वतीने अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.आपल्या लाडक्या बाप्पाला हार,नारळ,फुले, इतर नैवेद्य न आणता वही, पेन्सिल, रबर इतर शालेय साहित्य नैवेद्य गणेश भक्त घेऊन येत आहेत.या अनोख्या उपक्रमाला आजू बाजूच्या परिसरातील गणेश भक्तांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.हे सर्व शैक्षणिक साहित्य संकलन करून कल्याण ग्रामीण भागातील आदिवासी पाड्या मधील गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करणार आहे. या उपक्रमामुळे उल्हासनदी मध्ये जाणारे निर्माल्यचे प्रमाण कमी होईल. अशा अनोख्या उपक्रमाचे अनेक मंडळांनी अनुकरण केले पाहिजे.
Post a Comment