उल्हासनगर:
शहाड स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण ग्रामीण भागातील म्हारळगाव एमआयडीसीचा महाराज उद्या ३०ऑगस्ट रोजी सायंकाळी ०५.००वाजता म्हारळ जकात नाका येथून ते एमआयडीसी परिसरात आगमनाधीश होणार आहे.या अगोदर गणराज मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक धार्मिककार्य पार पडले आहे.गेल्या वर्षभरापासून येथे येणारे गणेश भक्त नारळ, फुलांचे हार बाप्पालाअर्पण न करता.येथे येणारा एक भक्त एक पेन व एक वही बाप्पा ला अर्पण करतो हे सर्व शैक्षणिक साहित्य गरीब विद्यार्थ्यांना वाटप केले जाते.या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून पर्यावरणाचे रक्षणही होते आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा या मंडळाचा एकमेव हेतू आहे.निर्माल्याचा कमी प्रमाणात वापर झाला तर उल्हासनदी मध्ये होणारे प्रदूषण काही प्रमाणत कमी होईल.कल्याण ग्रामीण भागातील सर्व गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनासाठी मंडळाच्या सदस्याच्या वतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment