उल्हासनगर:
नाभिक समाजाचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचे महान श्रेष्ठ संत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज भाई कोतवाल सामाजिक संस्था ( उल्हासनगर ) यांचेवतीने क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक,उल्हासनगर कँम्प नंबर -४ येथे अभिवादन आणि प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक १४ चे माजी नगरसेवक व शिवसेना उपशहर प्रमुख श्री.शेखर यादव,युवा सेना,उल्हासनगर पूर्वचे शहर अधिकारी श्री.सुशिल पवार यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला.
याप्रसंगी भाई कोतवाल सामाजिक संस्थेचे सचिव श्री.एम.आर.निकम,कोषाध्यक्ष श्री.अशोक जगताप,कार्याध्यक्ष श्री.राजन चव्हाण,उपाध्यक्ष श्री.संतोष खंडागळे,उपसचिव श्री.संदिप सायखेडे,उपकोषाध्यक्ष श्री.सोनु चावके,उपकार्याध्यक्ष श्री.अंकुश श्रीखंडे आणि सल्लागार श्री.मोहन क्षिरसागर, श्री.लक्ष्मण दळवी,श्री.मधुकर कोकाटे,श्री.मनोज कोरडे व सदस्य श्री.सचिन पवार,श्री.सतीश महाले,श्री.पुनित क्षिरसागर व कु.संदीप रावताळे यांचेसह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नाभिक समाज बांधव आणि नागरिकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.
Post a Comment