उल्हासनगर मध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा.





उल्हासनगर:

             १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झालेले असल्याने यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करत आहोत.

      घरो-घरी तिरंगा ही संकल्पना केंद्र सरकार,राज्य सरकार आणि स्थानिक महानगर पालिका प्रशासनाकडून राबविली गेलेली आहे.

      मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्याकडून ही मनसेच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करून दुचाकींवरून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.

            त्याच प्रमाणे उल्हासनगर मधील  मदरसे, मस्जिद समाजसेवी संस्थांच्या मार्फत मुस्लिम समाज बांधवांकडूनही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

      उल्हासनगर महानगर पालिकेच्या शेजारीच असलेल्या बरकातीया मस्जिद आणि मदरस्यांमधील विद्यार्थ्यांनी,मस्जिद ट्रस्ट च्या विश्वस्तांनी तसेच परिसरातील आणि शहरातील मुस्लिम समाजबांधवांकडून आज बरकातीया मस्जिद ते १७ सेक्शन,टेकडी परीसर,उल्हासनगर महानगर पालिका ते परत बरकातीया मस्जिद पर्यंत इंक्लाब जिंदाबाद,झंडा उंचा रहे हमारा,ईंक्लाब का नारा है,यह हिंदुस्थान हमारा है अश्या देशभक्तीच्या घोषणा देत पायी रॅली काढण्यात आली यामध्ये शेकडो मुस्लिम समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

  यावेळी मस्जिद ट्रस्ट चे हाजी रिजवान खान,जुबेर खान,सलीम भाई चैधरी,मोनू सिद्दीकी,सोनू शेख,डॉक्टर शहाबुद्दीन,मुन्ना भाई,राजू शहा,आखलाख खान,अन्वर खान,शाबीर इद्रिसी, नसरुद्दीन चौधरी,मुबिन शेख आणि शहरातील सर्वच मस्जिद आणि मदरस्यांचे विश्वस्त सहभागी झालेले होते.





Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget