उल्हासनगर - महिला व बाल कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानंतर्गत स्थापित बचत गटातील महिलांसाठी
दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी महिला व बाल कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानंतर्गत स्थापित बचत गटातील महिलांसाठी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा " बाबत मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला.
उल्हासनगर कॅम्प नंबर दोन येथील सकाळी ११.३० ते ५.०० दरम्यान संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त अजीज शेख, आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. तसेच महिलांना मार्गदर्शन ही केले . प्रमुख वक्ते श्री होवाळ सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये स्वातंत्र आणि संविधान याबाबत मार्गदर्शन केले. महिलांसाठी सामाजिक विषयावर पथनाट्य आयोजित केले होते . कार्यक्रमादरम्यान चहा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच महिलांना सुका कचरा व ओला कचरा साठविण्यासाठी DUSTBIN चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंकुश कदम यांनी केले तर नितेश रंगारी यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी आणि NULM विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक संजीवनी अमृतसागर, सर्व समुदाय संघटक आणि माविम च्या समन्वयक आणि सहयोगिनी यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment