उल्हासनगर: उल्हासनगर महानगर पालिकेच्या वतिने मा. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुलाच्या विकास कामाला उल्हासनगर-४ येथील वी. टी. सी. ग्राउंडवर लवकरच सुरवात करण्यात येणार आहे. पंरतु या क्रिडा संकूलाचा विकास करतांना तरण तलावा प्रमाणे हे क्रिडा संकूल ठेकेदाराच्या घशात न घालता गोर-गरिब मुलांना हे क्रीडा संकुल पुर्ण पणे मोफत असेल व येथे खेळाडूनां खेळण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अशी लेखी घोषणा महापालिकेच्या वतिने करण्यात यावी व नंतरच या क्रिडा संकुलाच्या कामाला सुरवात करण्यात यावी।
तसेच या मैदानाचा विकास करतांना पुर्वी सारखे म्हणजेच क्रिकेट प्रमाणे ईतरही मैदानी खेळ या मैदानावर खेळाडूंना सहज खेळता येतील व सध्या अस्तित्वात असलेल्या मैदानात कोणतेही बांधकाम केले जाणार नाही असेही महापालिकेने लेखी निवेदनाद्वारे जाहिर करावे तसेच आमच्या दोन्ही मागण्यांबाबत येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना १५ दिवसांनंतर आपल्या पध्दतीने आंदोलन करेल याची महापालिका प्रशासनाने नोंद घ्यावी। अश्या आशयाचे निवेदन आज उल्हासनगर महानगर पालिकेचे मा. आयुक्त साहेब व उपायुक्त श्री अशोक नाईकवाडे साहेब यांना देण्यात आले।
यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,जिल्हा उपसचिव संजय घुगे,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदिप गोडसे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,शहर सचिव शालीग्राम सोनवणे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,सह सचिव प्रवीण माळवे,उप-शहर अध्यक्ष सुभाष हटकर,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,उप-शहर अध्यक्ष राहुल वाकेकर,विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख, उप-विभाग अध्यक्ष मधुकर बागुल,अजय बागुल,अशोक गरड,महेश साबळे व सहकारी उपस्थित होते।
Post a Comment