महाराष्ट्र सरकार मधील मुख्यमंत्री शिवसेनेचा,परिवहन मंत्री शिवसेनेचा,तरी सुद्धा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नाहीत, ३५ एस टी कर्मचाऱ्यांना याच मुद्द्यावर आपला जीव गमवावा लागलेला असून सुद्धा विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अद्याप पर्यंत तोडगा निघालेला नसल्याने हा विषय आता ज्वलंत बनलेला आहे आणि या विषयावर लवकरात-लवकर तोडगा काढावा तसेच एस टी कामगारांच्या सर्वच न्याय्य मागण्या लवकरात-लवकर पूर्ण करण्यात याव्या यासाठी सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलेला असल्याने उल्हासनगर मनसे तर्फे विठ्ठलवाडी आगारातील आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना भेट देऊन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मनसे नेहमी त्यांच्या पाठीशी असेल आणि लवकरात-लवकर या विषयावर तोडगा न निघाल्यास रस्त्यावर उतरून कोणत्याही आंदोलनाला सामोरे जाण्याची मनसेची तयारी असल्याचे मनसेच्या शिष्टमंडळाने प्रशासकीय अधिकारी असलेले आगार प्रमुख यांना सांगितले।
यावेळी उपजिल्हा सचिव संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,शहर संघटक मैनुद्दीन शेख,उप शहर अध्यक्ष शैलेश पांडव,सुभाष हटकर,मुकेश सेठपलानी, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर,शुभम कांबळे,संतोष खत्रे,जितू शेट्टी,राहुल वाकेकर,महेश साबळे तसेच कल्याण पूर्वेचे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
Post a Comment