उल्हासनगर शहर शहर युवा अधिकारी पदी सुशील पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे।
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, उल्हासनगर व डोंबिवली विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत। या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम पाहून त्या कायम करण्यात येणार आहेत. असे जाहीर करण्यात आले आहे।
यात प्रामुख्याने उल्हासनगर उपजिल्हा युवा अधिकारी पदी केतन नलावडे, उल्हासनगर शहर शहर युवा अधिकारी पदी सुशील पवार, उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ व ५ उप शहर युवा अधिकारी पदी दाहिर रामटेके, उल्हासनगर कॅम्प क्रमांक अजय घोडके, उल्हासनगर, कॅम्प क्रमांक ५ शहर समन्वयक कमलेश मेंघानी, उल्हासनगर कॅम्प ४ व ५ शहर चिटणीस पदी प्रशांत पवार, उल्हासनगर, कॅम्प क्रमांक ४ व ५ आदी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती युवासेनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे।
उल्हासनगर शहर शहर युवा अधिकारी पदी सुशील पवार यांच्या नियुक्ती मुळे शहरातील युवा सेना पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सुशील पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांचा लोंढा मोठा प्रमाणात त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत।
Post a Comment