उल्हासनगर: पॅनल क्रमांक १ येथील एम आय डी सी रस्त्यावरील शिवनेरी नगर ते भोसले हॉस्पिटल या रस्त्यावरील मुख्य भुयारी गटारी (ड्रेनेज लाईन) मागील ५ वर्षांपासून तुंबलेल्या आवस्थेतच असल्याने संबंधित नगरसेवकाने परिसरातील गल्ल्यांमधील ड्रेनेज लाईन या गटारींमध्येच सोडलेल्या होत्या यामुळे परिसरातील लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता,भर रस्त्यावर दुर्गंधीयुक्त मैला वाहत असल्याचे चित्र खूपच किळसवाणे होते,शिवाय याच परिसरात ठाणे जिल्ह्यातील नावाजलेले विठ्ठल मंदिर ही आहे आणि याच विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशी घाण आणि दुर्गंधी असणे योग्य नसल्याने या विषयावर तोडगा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मैंनुद्दीन शेख यांनी २०१९ पासून पाठपुरावा सुरू केल्यानंतर उल्हासनगर महानगर पालिकेच्या जनरल निधीतून या ड्रेनेज लाईन च्या कामाला निधी उपलब्ध झाला आणि काम सुरु करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत.परंतु वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर ही काही स्थानिक नगरसेवकांच्या आततायी पणामुळे आणि श्रेय घेण्याच्या नादात कामाला थोडा उशीर होत होता परंतु तात्काळ काम सुरू करण्याच्या मनसेच्या इशाऱ्यानंतर उशिरा का होईना परंतु या कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आणि काम सुरू केल्याबद्दल उल्हासनगर महानगर पालिकेच्या संबंधित विभागाचे हार्दिक आभार.
आज दिनांक २५/१०/२०२१ रोजी परिसरातील नागरिकांच्या हस्ते उदघाटन करून कामाचा शुभारंभ झालेला आहे,
यावेळी उल्हासनगर मनसेचे शहर संघटक मैंनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष बादशहा शेख तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक आणि महिला वर्ग तसेच मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment