उल्हासनगर - उल्हासनगर मधील ब्ल्यु टायगर ग्रुपचे अध्यक्ष तसेच युवा नगरसेवक स्वप्नील नानासाहेब बागुल यांच्या वाढदिवसा निमीत्त भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की
MS Saki, SUZUKI,SUTHERLAND, amazon, IKS GeBBS, BYUS AEGIS, Tech WhiteHat.ir, Mahindra FINANCE Mahindra, या शिबिराला उपरोक्त कंपनी रोजगार शिबिरात सहभागी होणार आहेत आणि त्या कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध केली जाईल, शिबिराला येताना उमेदवाराने आपली आवश्यक कागज पत्र (BIODATA) सोबत घेऊन यावे. अशी माहिती नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी दिली।
या शिबिरात मोफत ई-श्रमकार्ड शिबीर यामध्ये
अपघाती मृत्यु (२ लाख रूपये विमा),
अपंगत्व स्थाई अपंग (२ लाख रूपेय विमा),
अपंगत्व (१ लाख रूपेय विमा),
भारती डाक योजनेचा लाभ,
आधार कार्ड लिंक
तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत
सर्वसाधारण शिष्यवृत्ती,
शिवण मशीन अनुदान योजना,
परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती,
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य,
क्रीडा शिष्यवृत्ती,
पाठ्यपुस्क अर्थसहाय्य,
वाहन चालक प्रशिक्षण,
इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण,
MS-CIT अर्थसहाय्य,
स्पर्धा परिक्षा, पूर्वतयारी प्रशिक्षण यासंदर्भात सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. हे रोजगार शिबिर ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत पर्यंत चालणार आहे।
या शिबिराला दीपा कंप्यूटर सेंटर व ईशान कॉम्पुटर सेंटर यांचे विशेष सहकार्य असणार आहे।
हे रोजगार शिबिर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, युवा नगरसेवक स्वप्नील नानासाहेब बागुल यांचे जनसंपर्क कार्यालय, उल्हासनगर - ३ या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे।
शिबिराला येणाऱ्या सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।
Post a Comment