उल्हासनगर - मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे यांच्या अथक प्रयत्नातून शहरात वैक्सेनिकेशन कॅम्प आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मनसेचे जिल्हा सचिव आणि पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांचे आभार व्यक्त केले आहेत।
समस्या तिथे मनसे ।
या प्रमाणे उल्हासनगर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्य सुरू केले असून त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत चालले आहे।
उल्हासनगर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधिल राजीव गांधी नगर येथिल रस्त्याची दुरवस्था झाली असून या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा साचिव संजय घुगे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर मनसेच्या प्रयत्नाला यश आले असून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला पालिकेने सुरवात केली आहे. या रस्त्याच्या कामाचे उदघाटन विभागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विभागातील नागरिकांसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
त्याचप्रमाणे ए ब्लॉक रोड, महात्मा गांधी नगर, बाळकृष्ण नगर, राजीव गांधी नगर, विदर्भवाडी, फाटक परिसरातील नागरिकांसाठी वैक्सेनिकेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे यांनी दिली. मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे यांनी सांगितले की या वैक्सेनिकेशन कॅम्पमध्ये जवळपास ३०० नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतला, तसेच त्यांनी पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी साहेबांचे आभार व्यक्त केले आहे।
Post a Comment