उल्हासनगर - छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल येथे संरक्षण भिंत तात्काळ बांधण्यात यावी अशी मागणी मनसे पदाधिकारी प्रदिप गोडसे यांनी पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे।
मनसे पदाधिकारी प्रदिप गोडसे यांनी पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल येथे बांधण्यात आलेली संरक्षण भिंत कमकुवत होऊन खाली पडल्याने त्याठिकाणी नवीन संरक्षण भिंत तात्काळ बांधण्यात यावी. उल्हासनगर कॅम्प ४ व कॅम्प -५ ला पूर्व व पश्चिमेला जोडणारा छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल आहे।
सदर उड्डाणपुल खालून रेल्वे लाईन आहे। सदर उड्डाणपूलावरून असंख्य वाहतुकींची वर्दळ असते व त्याचप्रमाणे सदरं उड्डाणपूलच्या दोन्ही बाजूस नागरिकांना चालण्यास फुटपाथ बनविण्यात आला आहे। सदर फुटपाथ वरून अनेक व्यक्ती शाळकरी मुलांपासून तर वयोवृद्ध ये-जा करत असतात। सकाळच्या व सायंकाळच्या वेळेस नागरिक आपला वेळ घालवण्यासाठी येत असतात त्यामुळे येथे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते। त्यामुळे याठिकाणी संरक्षण भिंत तात्काळ बांधण्यात यावी। अशी मागणी मनसे पदाधिकारी प्रदिप गोडसे यांनी केली आहे।
Post a Comment