उल्हासनगर शहर हे व्यापाऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते, शहरात अनेक प्रकारच्या छोट्या-मोठ्या कंपन्या,कारखाने असल्याने साहजिकच अनेक असंघटीत कामगार आपल्या उपजीविकेसाठी या ठिकाणी काम करतात,परंतु कामगारांच्या हिताच्या असलेल्या अनेक शासकीय योजनांची माहिती या कामगारांना नसल्याने त्यांना मिळणाऱ्या अनेक शासकीय सुविधांपासून हे गोर-गरीब कामगार वंचित राहतात आणि त्यांना शासकीय सुविधांचा लाभ घेता येत नही,भेटत नाही।
उल्हासनगर मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्याकडे अश्या असंघटित असलेल्या कामगारांची अनेक प्रकरणे आली आणि त्यांनी अश्या कामगारांना न्याय मिळवून दिला।
याच प्रकरणांची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊन मैंनुद्दीन शेख यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या उल्हासनगर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे।
माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय अरविंदजी गावडे यांचे हस्ते तसेच आमदार आणि मनसे नेते राजू दादा पाटील,जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव,सरचिटणीस राजनजी शितोळे आणि संयुक्त सरचिटणीस सागरजी चाळसे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत।
शहरातील सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित,माथाडी कामगारांची एकजूट करून त्यांच्या समस्या सोडविने,त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे त्यांना न्याय मिळवून देणे तसेच माथाडी कामगारांसाठी असलेल्या शासनाच्या अनेक योजना आणि सुविधांची त्यांना माहिती देऊन त्या सुविधांचा त्यांना लाभ मिळवून देणे हा आपला प्रामाणिक उद्देश असल्याचे शहर अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्यानंतर मैंनुद्दीन शेख यांनी सांगितले आहे।
यावेळी चिटणीस संजय नार्वेकर,उप-शहर अध्यक्ष बादशहा शेख,जगदीश माने,उप-चिटणीस हनुमंत जोगदंड,आनंदा बंडगर,रोहिदास ढवळे,गितेश तळपडे हे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे उल्हासनगर शहरातील सर्वच नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते।
Post a Comment