मुंबई - राज्यातीलमहानगर पालिका निवडणूक पॅनल पद्धतीने न करता एकल पद्धतीने घेण्याची सर्व सामन्यांची मागणी असून शासनाने पॅनल पद्धतीने निवडणूक घेऊ नये अशी मागणी राज्यातील विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य जनता करीत आहे।
राज्यात शासनाकडून महाराष्ट्रात आगामी काळात राज्यातील विविध महानगर पालिकेची निवडणूक होणार असल्याची घोषणा केली असून आपल्या सरकार मधील काही मंत्री आणि काही नेते मंडळी ही निवडणूक २ अथवा, ४ च्या पॅनल पद्धतीने घेण्याच्या विचारात असून संबंधित पॅनल पद्धतीला आमचा भारतीय नागरिक ह्या नात्याने विरोध आहे। ही निवडणूक पॅनल पद्धतीने घेण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आली आहे। या पॅनल पद्धतीने फक्त आणि फक्त मोठे पक्षाचेच उमेदवार निवडून येऊ शकतात।तसेच सर्वसाधारण असलेले अपक्ष उमेदवार कमी प्रमाणात निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पद्धतीने सर्वसामान्याच्या हक्कावर गदा आणल्या सारख जाणवत असून ही निवडणूक एक वार्ड (single ward/ एकल) पद्धतीने घेण्यात यावी जेणे करून सामान्य कार्यकर्ता सुद्धा या पद्धतीने निवडून येऊ शकेल, असे प्रा. प्रविण धर्मा माळवे यांनी म्हटले आहे।
Post a Comment