महाराष्ट्रात गणेश उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो..उल्हासनगर शहरातील बहुतांशी गणेश मंडळ ही ३० ते ४० वर्षे जुनी आहेत आणि ही सर्व मंडळे व मंडाळाचे पदाधिकारयांचे पोलिस प्रशासन व महानगर पालिका प्रशासनाशी वर्षानुवर्षाचे संबंध आहेत.या सर्व मंडळानी आजपर्यंत गेणेश उत्सव असो किंवा कुठलाही धार्मिक सण असेल कुठलही गालबोट न लागता उत्सव साजरे केलेले आहेत.गेल्या वर्षी कोरोणा काळात सुध्दा या मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांच तंतोतंत पालन करुन या मंडळांनी गणेश उत्सव साजरा केला असतांना दरवर्षी नविन नविन नियम आणून शहरातील गणेश उत्सव मंडळानां वेठीस धरण्याच काम जर प्रशासन करणार असेल तर हे बरोबर नाही।
तसेच ज्या जागेवर ३० ते ४० वर्षापासून गणेश उत्सव साजरा केला जातो आता त्या जागेवर मंडप टाकायचा नाही तर मंडप कुठे टाकणार साहेब एक तर आमच्या शहरात कुठेही जागा शिल्लक नाही.आणि नेहमीच्याच जागेवर जर वाहतुकीचे सर्व नियम पाळून मंडप टाकला जात असेल तर परवानगी दयायला काय हरकत आहे. वर्षानुवर्षे शांततेत गणेश उत्सव साजरा केला जात असतांना विनाकारण दरवर्षी नविन नविन अडचणी निर्माण करुन गणेश भक्तांना व मंडळांना वेठीस धरण्याच काम प्रशासन करत असेल तर हे योग्य होणार नाही.तरी आम्ही आपल्या विनंती करतो की मंडपाच्या परवानगी बाबत काही नियम व अटी थोड्या शितिल करुन कोरोणाच्या निममांच काटेकोरपणे पालन करणाऱ्या सर्व मंडळांना त्यांच्या नेहमीच्या जागेवर मंडप उभारण्याची त्वरीत परवानगी देण्यात यावी अशी मनसेच्या वतिने करण्यात आली।
Post a Comment