उल्हासनगर - उल्हासनगर महानगरपालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) च्या उल्हासनगर शहर जिल्हा कार्यकारीणीची बैठक दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा माजी गटनेते बी. बी. मोरे तसेच महाराष्ट्र कार्यकारीणीतील सचिव माजी नगरसेवक, सभापती नाना पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली।
उल्हासनगर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीत कमीत कमी 12 नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बी. बी. मोरे यांनी यावेळी सांगितले।
या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी एक समिती गठीत कऱण्यात येईल तसेच या समितीस केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा पक्षाचे नेते पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडून मान्यता घेण्यात येईल असे ठरले।
या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि शहर जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते।
यात प्रामुख्याने माजी नगरसेवक, माजी जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे, माजी नगरसेवक व माजी जिल्हाध्यक्ष जे. के. ढोके, माजी नगरसेवक शांताराम निकम, शहर जिल्हा महासचिव गंगाधर मोहोड, अंबादास गायकवाड, किशोर पवार, चंद्रकांत केदार, हरिभाऊ तायडे, महेंद्र अशोक बच्छाव, जॉनी डेव्हिड, कमलाकर सूर्यवंशी, जितू सरदार, विध्यार्थी संघटनेचे ऍड. नागसेन सूर्यवंशी, आयटी सेलचे उल्हासनगर अध्यक्ष जयेश जाधव, सुरजित पंजाबी उपस्थित होते।
Post a Comment