उल्हासनगर - सहा वर्षांच्या भाचीवर बलात्कार करणाऱ्या नराधम मामाला अटक करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आले आहे।
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी ही आपल्या वडिलांच्या बहिणीच्या घरी खेळण्यासाठी नेहमी जात असे. पीडित मुलीची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करून आपल्या संसाराचा गाडा हाकत होती. घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन नराधम मामा आरोपी रवि लक्ष्मण राजवाडया (34) याने गेल्या 2 महिन्यांपासून अल्पवयिन मुलीवर बलात्कार करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेने मामा भाची या नात्याला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून बलात्कारी मामाला जास्तीत जास्त कडक सजा करण्याची मागणी सर्वसामान्यातून होत आहे. बलात्कारी मामाला 18 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यासंदर्भात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा. रजि.क्रं २३५/२०२१ भारतीय दंड विधान कलम ३६७ ( अ ) ( ब )पोक्सो कायदा अंतर्गत नराधम मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
हिललाईन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद पाटील, पो. हवा पाटील, अहिरे, पो. ना कांबळे, जाधव, पो. शि. बाबु जाधव यांनी केवळ सहा तासाच्या आत आरोपीला पकडण्यात यश संपादन केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे।
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अंबिका धस्ते या करीत आहेत।
Post a Comment