उल्हासनगर - ज्यांनी कोविडच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या उल्हासनगरच्या सिद्धांत समाज विकास संस्थे तर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर २०२१ रोजी साजरा करण्यात आला।
वैद्यकीय आणीबाणीसाठी, कोविड योद्ध्यांकडून क्रॅश कोर्स करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। केंद्र सरकार कोविड -१९ कोविड योद्ध्यांसाठी कस्टमाईज्ड क्रॅश कोर्स सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी ऑनलाईन उद्घाटन करुन या कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केला।
या अभ्यासक्रमाचे २६ राज्यांमधील १११ केंद्रांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील ८ केंद्राच्या आणि ठाणे जिल्ह्यातील एकमेव केंद्र म्हणून उल्हासनगरच्या सिद्धांत समाज विकास संस्थेची निवड झाली होती।
तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी उल्हासनगरच्या सिध्दांत समाज सामाजिक विकास संस्थेसही कोरोनाच्या सेवा करण्याची संधी मिळालेली आहे।
संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड करण्यात आलेल्या उल्हासनगरच्या सिद्धांत समाज विकास संस्थेच्या प्रशिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संवाद साधला होता. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातून सिद्धांत समाज विकास संस्थेची निवड ही गौरवास्पद बाब आहे. याच सिद्धांत समाज विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालक श्री. सत्यवान माणिक जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला।
Post a Comment