भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्रात उद्देशिका लावण्याची मनविसे ची मागणी।

 




उल्हासनगर:

                 २६  नोव्हेंबर हा संविधान दिवस असुन  देशातील विविध जाती धर्मांच्या लोकांना तसेच पशुपक्षांना एकसमान वागणुक व  जगण्याचे अधिकार देणारी राज्यघटना याच दिवशी भारतरत्न डॉ बाबासाहेेब आंंबेडकर यांनी देशाला लोकार्पण केली आहे.  त्यामुळे  हा संविधान दिन देशभर साजरा करन्यात येतो .  

      दरम्यान संविधानाचा सरनामा असलेली  उद्देशिका ही तमाम भारतीयांना त्यांचे अधिकार व कर्तव्य यांची सदैवं आठवण करून देत असते. याच संविधान दिनाच्या निमित्ताने  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून उल्हासनगर शहरातील कँप ३ येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या प्रवेशद्वाराच्या प्रथमदर्शनी भागात  भव्य उद्देशिकेची प्रतिष्ठापना व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सचिव तन्मेश देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ.राजा  दयानिधी व महापौर लिलाबाई आशान यांच्या कडे निवेदन देऊन केली आहे.

     या शैक्षणिक अभ्यास केंद्रात उद्देशिका लावल्यास या अभ्यासकेंद्रात स्पर्धा परीक्षा व इतर विषयाचा अभ्यास करणाऱ्या  विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा मिळत राहील तसेच आपले संविधानिक मुल्ये व अधिकार यांची जाणीवही होत राहिल या उद्देशाने या अभ्यासिकेत उद्देशिका बसवण्याची नितांत आवश्यकता आहे .असे तन्मेश देशमुख यांनी सांगितलेआहे.सदर निवेदन देते वेळी मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख, मनविसेचे .शहर अध्यक्ष मनोज शेलार, मनविसेचे  शहर संघटक अशोक गरड, मनविसेचे  शहर सचिव सचिन चौधरी, मनसे विभाग अध्यक्ष अनिल गोधडे तसेच तन्मेश देशमुख उपस्थित होते.


Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget